Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Nov 22nd, 2019

  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

  मुंबई, : राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांच्या स्वयंरोजगार प्रकल्पांना आर्थिक सहाय्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणाऱ्या राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  मुंबई शहर व उपनगरामधील सुशिक्षित नवउद्योजक बेरोजगारांना वाढत्या लोकसंख्येचा विचार करता तसेच उद्योग व्यवसायामध्ये व्यापक प्रमाणात पूरक गुंतवणुकीसाठी राज्य शासनामार्फत नव्यानेच कार्यान्वित झालेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) सद्यस्थितीत मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ही योजना 100 टक्के ऑनलाईन कार्यप्रणालीनुसार राबविण्यात येते. इच्छुक अर्जदारांनी योजनेची माहिती तसेच ऑनलाईन अर्जासाठी maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुंबई प्राधिकरण विभागाचे उद्योग सह संचालक पी.जी. राठोड यांनी केले आहे.

  योजनेंतर्गत सेवा उद्योगासाठी कमाल रु. 10.00 लाखाचे व उत्पादन प्रकल्पासाठी कमाल रुपये 50 लाखांचे अर्थसहाय्य बँकेमार्फत दिले जाते. ज्यामध्ये शासनाचे अनुदान प्रवर्गनिहाय 15 ते 25 टक्के देय आहे. तसेच अर्जदाराची स्वगुंतवणूक 5 ते 10 टक्के भरावी लागणार आहे. आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.
  1) जन्म दाखला/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/वयाचा पुरावा
  2) शैक्षणिक पात्रतेसंबंधीचे कागदपत्रे/प्रमाणपत्रे
  3) आधार कार्ड
  4) जातीचे प्रमाणपत्र (एस.सी./एस.टी. प्रवर्गासाठी)
  5) विशेष प्रवर्गासाठीचे पूरक प्रमाणपत्र (अपंग, माजी सैनिक)
  6) स्वसाक्षांकित विहित नमुन्यातील वचनपत्र (Undertaking)
  7) प्रकल्प अहवाल

  अधिक माहितीसाठी संपर्क साधा-

  उद्योग सह संचालक (मुंप्रावि) यांचे कार्यालय,
  विकास सेंटर, 702, 7 वा मजला, सी. गिडवाणी मार्ग,
  बसंत सिनेमागृहाजवळ, चेंबूर (पूर्व), मुंबई – 400074
  Email ID : [email protected]


  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145