Published On : Mon, Jun 23rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा थाटात समारोप विजेत्या कुस्तीपटूचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिका व शहर कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित १५ वर्षांखालील मुले व मुलींच्या मुख्यमंत्री चषक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा २०२५ या स्पर्धेचे समारोप रविवारी (ता.२३)झाला.

समारोप कार्यक्रमात महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष श्री. रामदास तडस, विदर्भ कुस्तीगीर संघ कार्याध्यक्ष श्री. संजयजी तिरथकर, हिंदकेसरी श्री. योगेशजी दोडके, श्री. पद्माकर चारमोडे, महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर, आयोजन समितीचे उपाध्यक्ष श्री.दयाराम भोतमांगे, श्री.विनोद बघेल. श्री. सतीश वाडे, श्री. सुरज ज्योतिकर, श्री.सचीन देशमुख, श्री.असफाख शेख, श्री. नीरज माधव, श्री. अविनाश लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
Feb20 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,400 /-
Gold 22 KT ₹ 1,44,500 /-
Silver/Kg ₹ 2,47,200 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिका व शहर कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रायसोनी एज्युकेशन ग्रुपच्या सहकार्याने मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात तीन दिवस चाललेल्या स्पर्धेत फ्रिस्टाईल कुस्ती स्पर्धेत मूलामध्ये प्रथम क्रमांक हरियाणा, दुसरा क्रमांक महाराष्ट्र, तिसरा क्रमांक दिल्ली यांनी पटकावला. अंडर 15 मध्ये – फ्रिस्टाईल मुलीमध्ये प्रथम क्रमांक हरियाणा, द्वितीय क्रमांक महाराष्ट्र्र, तृतीय क्रमांक दिल्ली यांनी पटकाविला तर अंडर 15 ग्रीको रोमनच्या मुला मुली कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक हरियाणा, द्वितीय क्रमांक महाराष्ट्र्र, तृतीय क्रमांक राजस्थान ने पटकाविला. समारोप प्रसंगी स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे प्रमाणपत्र आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष श्री. रामदास तडस म्हणाले की, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेने सर्व राज्यांना जोडण्याचे काम केलेले आहे. २०१४ पासून खेळांना सरकारचा राजाश्रय मिळू लागल्याने महाराष्ट्रातील प्रतिभावंत स्पर्धकांना त्याचा फायदा मिळू लागला आहे, प्रस्ताविक करताना डॉ. पियुष आंबूलकर म्हणाले की, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धामुळे नागपूर आणि विदर्भातील खेळाडूंना नवीन शिकण्याची आणि प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली. येणाऱ्या दिवसात आंतरराष्ट्रीय स्पर्धा ही आपण आयोजित करण्याच्या प्रयत्न करून असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन आर जे आमोद यांनी केले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement