Published On : Wed, Feb 19th, 2020

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

नागपूर : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नागपूर नगरीच्या वतीने महापौर संदीप जोशी व उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे यांनी गांधीद्वार महाल स्थिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महापौरांनी शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देऊन हा उत्साह आम्हाला जनकल्याणाच्या कामासाठी सदैव प्रेरणा देईल, असे सांगितले.

यावेळी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, माजी महापौर प्रवीण दटके, प्रतोद दिव्या धुरडे, लकडगंज झोन सभापती राजकुमार सेलोकर, नगरसेवक किशोर वानखेडे, राजेश घोडपागे, लखन येरावार, विजय चेटुले, माजी नगरसेवक प्रमोद पेंडके, बंडु राऊत, राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे मिलिंद येवले व अन्य विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.