Published On : Sat, Mar 14th, 2020

छत्रपती संभाजी महाराज व सावित्री बाई फुले संयुक्त पुण्यतिथि साजरी

कन्हान : – शहर विकास मंच व्दारे छत्रपती संभाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांची संयुक्त पुण्यतिथि कार्यक्रम शिवाजी नगर कन्हान येथे संपन्न झाला. कार्यक्रमास कन्हान-पिपरी नगर परिषदचे नगरसेवक अनिल ठाकरे यांनी छत्रपती संभाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेला माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाला सुरू वात केली.

कार्यक्रमात उपस्थित कन्हान शहर विकास मंचचे अध्यक्ष प्रवीण गोडे, महासचिव सोनु मसराम, मंच सदस्य रंजनिश ऊर्फ बाळा मेश्राम, यांनी छत्रप ती संभाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांचा जीवनावर मार्गदर्शन केले.

Advertisement

कार्यक्र मात उपस्थित सर्व मंच पदाधिकारी यांनी व नागरिकांनी छत्रपती संभाजी महाराज व सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन व दोन मिनटाचे मौनधारण करुन भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मंच सदस्य अखिलेश ऊर्फ बाळा मेश्राम यांनी केले.

कार्यक्रमास कन्हान शहर विकास मंचचे उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव अभिजीत चांदुरकर, मुकेश गंगराज, हरी ओम प्रकाश नारायण, महेश शेंडे, सोनु खोब्रागडे, नितिन मेश्राम, संजय रंगारी, सतीश ऊके, मनिष शंभरकर, प्रदीप राणे, अजय चव्हान, प्रकाश कुर्वे, हर्ष पाटील, शुभम बावनकर, अमित भारव्दा ज, शाहरुख खान, अक्षय फुले आदीसह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement