Published On : Sat, Mar 14th, 2020

क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांची जयंती साजरी

कन्हान : – बिरसा बिग्रेड कन्हानच्या वती ने क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांची १८७ वी जयंती पुरानी पानीच्या टाकी जवळ पिपरी येथे साजरी करण्यात आली.

कार्यक्रमात भुमीतीताई परतेकी यांनी क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलित करुन सुरूवात केली. यावेळी उपस्थित कन्हान शहर विकास मंचचे अध्यक्ष प्रवीण गोडे, मंच सदस्य रंजनिश ऊर्फ बाळा मेश्राम यांनी बाबुराव शेडमा के यांच्या जीवन चरित्र्यावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात उपस्थित सर्व महिला, पुरूष नागरिकांनी बाबुराव शेडमाके यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले. बुंदीचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

सुत्रसंचालन मंच महासचिव सोनु मस राम यांनी तर आभार मंच सदस्य सोनु खोब्रागडे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमास कन्हान शहर विकास मंचचे उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, रमेश मसराम, सुनिल कोडवते, सुकल वाढीवे, रोशन परतेकी, विजय कुमरे, राजु कोडवते, सुरेश मस राम, सुधाकर ठाकरे, वर्षा मसराम, रुक्माबाई कोडवते, सोनम कोडवते, मनीष कोडवते सहित मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.