कोराडी जगदंबा मंदिरात रविवारी छप्पनभोग अन्नकूट

नागपूर: श्री महालक्ष्मी जगदंबा कोराडी मंदिर येथे संस्थानच्या वतीने येत्या रविवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी छप्पनभोग अन्नकूटाचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारी आरतीच्या वेळी जगदंबा मातेला छ÷प्पनभोग पक्वान्नांचा नैवेद्य अर्पण करण्यात येईल. त्यानंतर दुपारी 12.30 ते 3 या दरम्यान भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

छप्पनभोग अन्नकूट प्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या सर्व विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.