Published On : Wed, Nov 6th, 2019

दिव्यांगाच्या समस्या करिता कन्हान नगरपरिषदेवर मोर्चा

दिव्याग निधी वाटप विषयी येत्या ५ दिवसात कार्यवाही – गावंडे

कन्हान : – नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत रहिवासी दिव्यांगाच्या समस्या तातडीने निवारण करण्याकरिता रामटेक विधानसभा प्रहार संघटक रमेश कारेमोरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढुन मुख्याधि कारी सतिश गावंडे यांच्याशी चर्चा करून निवेदना व्दारे मागणी करण्यात आली.

Advertisement

नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत दिव्यांग बांधवांना शासन निर्णयानुसार त्यांच्या मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ३% निधी २०१५पासुन न मिळाल्याने नगरपरिषदेवर रोष व्यकत करित दिव्यांग बांधवांनी प्रहार संघटक रामटेक विधानसभा रमेश कारेमोरे यांच्या नेतृत्वात मंगळवार (दि.४) ला दुपारी १ वाजता मोर्चा काढुन कन्हान नगरपरिषदे जवळ बऱ्याच कामासाठी निधी उपलब्ध होत असुन फक्‍त दिव्यांग लोकांच्या सोयी सुविधा करिताच निधी उपलब्ध नाही का ? दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या निवारण करण्या करिता वेळ नाही का ? यास्तव नगरपरिषद मुख्यधिकारी यांच्या कार्यालया समोर ठिय्या आंदोलन केले असता मुख्याधि कारी सतिश गांवडे स्वतः खाली बसुन चर्चा करून दिव्यांग निधी वाटप विषयी योग्य ती कार्यवाही येत्या पाच दिवसात करण्यात येईल तसेच याविषयी चर्चा करण्यासंबंधिची बुधवार (दि.६) ला दुपारी २ वाजता बैठक आयोजित केली आहे.

असे पत्र दिव्यांग बांधवांना मुख्या धिकारी हयानी दिले. असता पाच दिवसात दिव्यांगाच्या मागण्या दिलेल्या निवेदना व चर्चा नुसार पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिव्यांग बांधवांनी दिला. याप्रसंगी रामटेक विधानसभेचे प्रहार संघटक रमेश कारामोरे, महेंद्र भुरे, योगेश पात्रे, सागर फरकाडे, जयेश रामटेके, प्रवीण माने, मनीष भिवगडे, पुरुषोत्तम लोडेकर, सुभाष मेश्राम, नमिता वंजारी, रेश्मा रोडेकर सहित मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement