Published On : Fri, Aug 9th, 2019

चारपदरी सिमेंट रस्ता नाली व फुटपाथ बांधकामाची चौकसी करा

कन्हान : – राष्ट्रीय महामार्ग चारपदरी सिमेंट रस्त्याच्या नाली व फुटपाथ निर्माण बांधकाम निष्काळजीने व निकृष्ट दर्जाचे होत असल्याने संबंधित उच्च अधिका-यांनी या बांधकामाची चौकसी करून कंत्राटदाराला दंडात्मक कार्यवाही करून बांधकाम व्यवस्थित करण्यात यावे. अशी मागणी सत्य शोधक संघ कन्हान व परिसरातील नागरिकांनी केली आहे.

ऑटोमोटिव्ह चौक नागपुर ते टेकाडी बस स्टाप पर्यंत चारपदरी सिमेंट रस्ता निर्माण काम केसीसी कंपनी व्दारे अत्यंत मंद गतीने व निष्काळजीने सुरू असल्याने नाली व फुटपाथ बांधकाम व्यवस्थित होत नसुन सुरू असतानाच नाली तुटफुट होत आहे. यांचे उदाहरण म्हणजे कन्हान पोलीस स्टेशन जवळ आज दि.९ऑगस्ट ला सकाळी ८ वाजता एक १२ चाकी ट्रक रस्ता विसल्याने ट्रक पलटविण्याकरिता मागे घेताना मागचा भाग हलकासा लागल्याने सिमेंट नाली २ फिट सामोर ढकल्या गेली आणि नवीन विधृत मोठा खांब जमिनीतुन निघुन खाली पडला. सुदैवाने कुठलीही जिवहानी झाली नाही.

यामुळे सिमेंट रस्ता लगतच्या दुकानदारा मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी सत्य शोधक संघ कन्हान चे प्रशांत भाऊ वाघमारे, सतिश भसारकर, शक्ती पात्रे, दिनेश नारनवरे, महेश ढोंगडे, रजनिश मेश्राम, शेखर बोरकर, विनोद यादव व परिसरातील नागरिकांनी केसीसी च्या नाली, फुटपाथ व विधृत खांबाच्या निर्माण बांधकामाची संबंधित उच्च अधिका-यांनी योग्य ती चौकसी करून केसीसी कंत्राटदारावर दंडात्मक कार्यवाही करून नियमानुसार व व्यवस्थित बांधकाम करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.