– लाभार्थ्यांना दुपट्टा, प्रमाणपत्र, घराची चाबी व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित
रामटेक– पंचायत समिती रामटेक येथे रामटेकचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या हस्ते व गटविकास अधिकारी प्रदीप बमनोटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाआवास अभियानांतर्गत घरकुल बांधून पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांचे ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमामध्ये लाभार्थ्यांना दुपट्टा, प्रमाणपत्र, घराची चाबी व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक गटविकास अधिकारी पी. के. बमनोटे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात तहसीलदार मस्के यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. व घरकुल काम मुदतीत पूर्ण करून गृहप्रवेश करीत असल्याबाबत शुभेच्छा दिल्या. संचालन सागर वानखडे यांनी केले, तर आभार राजेश जगणे यांनी मानले.
कार्यक्रमाला विकास अधिकारी अनिल रामटेके, विकास अधिकारी (आरोग्य) रामहरी कुबडे, रवींद्र सुखदेवे, नरेगा एपीओ अर्जुन खेवले, बीआरसी एसबीएम राजू मडामे, सचिन सोमकुंवर, मनसरचे पोलिस पाटील ईश्वर मलघाटे, बलदेव, आशा चौहान, कल्पना व लाभार्थी उपस्थित होते.
			








			
			