Published On : Tue, Feb 23rd, 2021

खाण उद्योगात होत असलेला बदल आणि उद्योजकांसाठी संधी

Advertisement

·शासकीय तंत्रनिकेतन येथे कार्यशाळा
·विदर्भातील सहाशे विद्यार्थ्यांचा सहभाग

नागपूर : खाण उद्योगामध्ये होत असलेल्या बदलांचा तसेच संशोधनांचा वेध घेवून युवा उद्योजकांसाठी असलेल्या संधी या विषयावर शासकीय तंत्रनिकेतन येथे विदर्भातील अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन संस्थांमध्ये खनिकर्म या विषयातील विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत खनिकर्म विषयात शिक्षण घेत असलेले 603 विद्यार्थी सहभागी झाले होते.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

खनिकर्म व खाण सर्वेक्षण विभाग, शासकीय तंत्रनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने खाण उद्योगातील ‘अलीकडील ट्रेड आणि उद्योजकता संधी’ या विषयावर आयोजित एक दिवसीय वेबिनारमध्ये वेकोलीचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक दिवाकर गोखले, रॉकेट सिस्टिम्स ॲण्ड प्रोजेक्टचे संस्थापक मनोज गुऱ्हारीकर, युवा उद्योजक गौरव ब्राम्हणकर तसेच शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचे प्राचार्य व सहसंचालक डॉ. मनोजकुमार डायगव्हाणे उपस्थित होते.

खाण उद्योगात नवीन उद्योजकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी देशात नव्याने विकसित होत असलेल्या उद्योगाकडे आकर्षित होवून स्वत:चा उद्योग सुरु करावा, असे आवाहन डब्ल्यूसीएलचे क्षेत्रीय महाव्यवस्थापक दिवाकर गोखले यांनी केले. निसर्ग आणि खाण काम याचा उत्तम संतुलन राखण्याच्या दृष्टीने डब्ल्यूसीएलने हाताळलेल्या विविध इको संवर्धन प्रकल्पाची माहिती दिली. खनिकर्म पदविका अभ्यासक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले.

उद्योग क्षेत्रामध्ये परंपरागत उपलब्ध असलेल्या संधीपेक्षा नवसंशोधनावर आधारित उद्योग सुरु करण्यासाठी युवा अभियंत्यांनी पुढाकार घेताना या क्षेत्रातील अनुभव संपादन करण्यासाठी प्रत्यक्ष व्यवसायात काम करण्याची संधी उपलब्ध करुन देताना कुठेही भीती बाळगू नये, असे आवाहन मनोज गुऱ्हारीकर यांनी केले. यावेळी युवा उद्योजक गौरव ब्राम्हणकर यांनीही मार्गदर्शन केले.

अभियांत्रिकी तंत्रनिकेतन संस्थेचे प्राचार्य तथा सहसंचालक डॉ. मनोजकुमार डायगव्हाणे यांनी उद्योग आणि संस्था सहकार्याच्या एकत्रिततेवर आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळातच कामाच्या संस्कृतीत आणणे सोपी जाईल. तसेच समाजसेवेचे आणि उद्योगांना फायदा होण्याचे दुहेरी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी डब्ल्यूसीएलने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

जीएचआरसीएसटी महाविद्यालयाच्या बीबीए विभागाच्या एचओडी डॉ. ज्योती समसरिया यांनी उद्योजकतेच्या आवश्यक बाबींवर ‘फर्स्ट फूट फॉरवर्ड’ सत्र आयोजित केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आयआयटी खडगपूर “भूमिगत खाणीत पावडर घटक सुधारण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आधारित संगणकीय मॉडेलिंग सिस्टम” या प्रोजेक्टसाठी पारितोषिक प्राप्त संस्थेच्या खनिकर्म विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. उद्योजकतेच्या उद्दिष्टांविषयी अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे विभाग प्रमुख बी. जे. नायडू यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक डॉ. राजेश्वरी वानखेडे, डॉ. रुपाली लोंढे, प्रा. जे. टी. रावण, प्रा. देवेंद्र सुरकार, प्रा. हेमंत शेंडे यांनी अथक प्रयत्न केले. सूत्रसंचालन डॉ. रुपाली लोंढे यांनी तर आभार प्रा. देवेंद्र सुरकार यांनी मानले.

Advertisement
Advertisement
Advertisement