Published On : Tue, Aug 4th, 2020

कोराडीच्या राम मंदिर बांधकामासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांचाच पुढाकार

-राम तोडवाल,विश्वस्त

नागपूर : कोराडीच्या प्रभुरामचंद्रांच्या मंदिराबाबत काही समाजविघातक मंडळींनी समाज माध्यमातून अपप्रचार करणे सुरू केले असल्याचे दिसून आले. कोराडी तलावाजवलील श्रीरामाचे मंदिराचे मंदिर बांधकामासाठी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेच पुढाकार घेत आहेत, ही वस्तुस्थिती असल्याचे मंदिराचे विश्वस्त राम तोडवाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

सर्वसामान्य नागरिक आणि प्रभू रामचंद्रांच्या भक्तांमध्ये कुठलाही संभ्रम राहू नये म्हणून पुढील वस्तुस्थिती लक्षात आणून देण्यात येत आहे.

श्रीमहालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडीला शासनाचा राज्यस्तरीय ब वर्ग यात्रा स्थळाचा दर्जा मिळाला आहे. या अंतर्गत नवीन पुनर्विकास आराखड्यात महानिर्मितिच्या तलावाच्या काठावरील राम मंदिर स्थलांतरित करून कोराडी मंदिराच्या मागील बाजूला प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे. हे काम 70 टक्के पूर्ण झाले असून 2021 च्या श्रीरामनवमी पूर्वी हे काम पूर्ण होईल. त्याच राम नवमीच्या पवित्र दिवशी जुन्या मंदिरातील प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल. त्यादिवसापासून हे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात येईल.

या श्रीराम मंदिरासाठी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच पुढाकार घेतला असून त्यांच्या कल्पक नेतृत्वाखाली या मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. श्री बावनकुळे हे धार्मिक वृत्तीचे असून त्यांनी अनेक धार्मिक संस्थांना मदत केली आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे अनेक धार्मिक स्थळे पूर्णत्वास गेली आहेत.

या स्थळांच्या विकासासाठी बावनकुळे परिश्रम करीत आहेत. परंतु काही सामाजविघातक मंडळींनी यासंदर्भात अपप्रचार सुरू केला आहे. हे श्रीराम मंदिर ज्या दिवशी पूर्णत्वास जाईल त्यादिवशी श्री बावनकुळे यांच्या धार्मिक कार्यामध्ये आणखी एक मानाचे कार्य जोडले जाईल, असेही राम तोडवाल यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.