Published On : Tue, Jul 21st, 2015

चंद्रपुर : जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची 22 ला सभा

Advertisement


विविध मागण्या घेऊन जिल्हाधीकारी ला निवेदन 

भद्रावती (चंद्रपुर)। कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या विविध मागण्या घेऊन आज 22 जुलै ला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सभा घेण्यात येउन शिष्ठ मंडळाच्या वतीने मागण्या निवेदन सादर करण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयातील उच्च माध्य. शिक्षक उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे.

संच मान्यतेचे बदलेले निकष, वाढीव पदावरील मंजूर शिक्षकांना वेतन मंजूर करणे, 2005 पूर्वीच्या तुकड्यांना टप्पा अनुदान व अर्धवेळ सेवेत असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करणे अशा महत्वाच्या मागण्या करिता जिल्ह्यातील 500 हून अधिक शिक्षक 22 जुलै का जिल्हास्तर एकत्र येणार आहे. सर्व कनिष्ठ महा. शिक्षक मिळून सभा घेणार असून जिल्हाधिकारीना निवेदन देणार आहे. त्यानंतरही सरकार ने दाद न दिल्यास टप्प्या टप्याने आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा विज्युक्हा व महासंघ यांच्यातर्फे शासनाला देण्यात आला आहे.

संच मान्यतेच्या नव्या नियमानुसार तब्बल २ हजार तुकड्या कमी होऊन 90 हजार शिक्षक अतिरिक्त करणार आहे. शासनाने 1999, 2000, 2001 चे विद्यार्थी संख्येविषयीचे निषक डावलून शहरी, ग्रामीण, आदिवासी भाग माध्यमिक शाळांना जोडून असणारी वर्गे व वरिष्ठ महा. ला जोडून असलेले वर्ग यांची विद्यार्थी तुकडी संख्या वेगवेगळी होती. परंतु ओनलाइन सॉफ्टवेअर मधे माध्यमिक शाळांना जोडून असलेल्या तुकडीसाठी 80 व वरिष्ठ महा. ला जोडून असलेल्या तुकडीसाठी 120 विद्यार्थी संख्या सॉफ्टवेअर मधे घेण्यात यावी. कनिष्ठ महा. प्रशासन स्वतंत्र करावे आदी मागण्यासाठी विज्युक्हा व महासंघा च्या आदेशप्रमाणे जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी २ वाजता एकत्रित होण्याचे आवाहन विज्युक्हा जिल्हाध्यक्ष प्रा. अशोक पोफळे यांनी केले आहे.

Representational Pic

Representational Pic