Published On : Thu, Aug 27th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर जवळच्या चंदनपारडी येथे फार्म हाऊसला भीषण आग; ४० मिनिटांत इमारत जळून खाक!

Advertisement

चंदनपारडी में फार्म हाउस में भीषण आग, 40 मिनट में इमारत जलकर खाक

नागपूर : कोंढाळीपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या चंदनपारडी गावाजवळ एका फार्म हाऊसला गुरुवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने अवघ्या ४० मिनिटांत संपूर्ण फार्म हाऊस जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगीची माहिती मिळताच कोंढाळी पोलिसांनी तातडीने कोंढाळी नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत फार्म हाऊसचा बहुतांश भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. हे फार्म हाऊस नागपूर येथील एका व्यक्तीच्या मालकीचे असल्याची माहिती आहे.

फार्म हाऊस तलावाच्या काठावर असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण इमारत जळून मोठे नुकसान झाले होते.

आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोंढाळी पोलीस आणि संबंधित विभागाकडून घटनेचा तपास सुरू आहे. दरम्यान, या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नसल्याने मोठा अनर्थ टळला.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.