Published On : Fri, Mar 29th, 2019

प्रसन्ना कुमार जेना रामटेकसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक

रवीभवन येथे मतदारांसाठी उपलब्ध

नागपूर : निवडणूक आयोगाने ओडिशा कॅडरच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रसन्ना कुमार जेना यांची रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. प्रसन्ना कुमार जेना हे ओडिशा कॅडरच्या 2005 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

रामटेक लोकसभा मतदारसंघात मुक्त वातावरणात निवडणुका घेण्याच्यादृष्टीने मतदारांसाठी त्या रवीभवन येथे उपलब्ध राहणार आहेत. लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकसंदर्भात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. निवडणूक निरीक्षक प्रसन्ना कुमार जेना यांचा मुक्काम रवीभवन कॉटेज क्रमांक 9 येथे असून त्यांचा भ्रमण ध्वनीक्रमांक 9022207090 असा आहे. सर्व मतदारांना त्या सकाळी 11 ते 1 या वेळेत रवीभवन येथे उपलब्ध आहेत.