Published On : Wed, Nov 20th, 2019

सीमेंट रोड बांधकामाकरिता वाहतूक बंद

Advertisement

मनपा आयुक्तांचे आदेश : धरमपेठ झेंडा चौक ते ट्रॉफिक पार्क रोडची वाहतूक ३१ मार्चपर्यंत प्रलंबित

नागपूर : नागपूर महानगरपालिकेद्वारे सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत धरमपेठ झेंडा चौक ते ट्राफीक पार्क रोडवरील वाहतूक सीमेंट रोड बांधकामाकरिता बंद करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

Gold Rate
May 02- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,50,800 /-
Gold 22 KT ₹ 1,40,200 /-
Silver/Kg ₹ 2,51,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर महानगरपालिकेद्वारे सिमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ पॅकेज क्रमांक ८ मधील रस्ता क्रमांक ३४ गोकुलपेठ बाजार रोड, कॉफी हाउस चौक (वेस्ट हायकोर्ट रोड) ते रामनगर टेकडी रोड व कॉफी हाउस ते धरमपेठ झेंडा चौक ते गजानन मंदिर ते ट्राफीक पार्क पैकी धरमपेठ झेंडा चौक ते ट्राफीक पार्क मार्गावर सीमेंट रस्ता तयार करण्यात येणार आहे.

या कामामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक २५ नोव्हेंबर २०१९ ते ३१ मार्च २०२० पर्यंत बंद राहणार आहे. सदर मार्गावरील वाहतूक वळती रस्त्यांवरून वळविण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. सदरबाबतचे लेखी आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement