Published On : Sat, Jul 20th, 2019

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी

कन्हान : – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथि कार्यक्रम भाजपा कन्हान शहर व्दारे आयोजित करून साजरी करण्यात आली.

संताजी नगर कांद्री धर्मराज शाळेच्या मागे वार्ड क्र ६, येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास माजी नगराध्यक्ष सौ. अॅड आशाताई पनिकर यांच्या हस्ते माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर उपस्थित मान्यवर भाजपा पदाधिकारी हयानी मार्गदर्शन केले. सर्वानी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन भाजपा कन्हान शहर महामंत्री सुनील लाडेकर हयानी तर आभार प्रदर्शन भाजपा कन्हान शहर प्रसिध्दी प्रमुख ऋृषभ बावनकर हयानी केले. याप्रसंगी भाजपा कन्हान शहर अनु: सुचित जाती मोर्चा अध्यक्ष हर्ष पाटील, चंदन मेश्राम, शाहरुख खान, प्रकाश कुर्वे , अमोल साकोरे, शैलेश शेळकी, रिंकेश चवरे, म मुकेश गंगराज, हरीओम नारायण, सचिन यादव, नितिन मेश्राम सह भाजपा कार्यकर्ता व नागरिक उपस्थित होते .