कन्हान : – स्वराज्याचे रक्षक, आठ भाषे वर प्रभुत्व गाजविणारे प्रराक्रमी योध्दा, बुध्दीमान, साहित्यिक राजे छत्रपती संभा जी महाराज यांची जयंती शिवाजी नगर येथे कन्हान शहर विकास मंच व्दारे साजरी करण्यात आली.
गुरूवार (दि.१४) मे ला शिवाजी नगर कन्हान येथे छत्रपती शिवाजी महा राज पुतळयास शहर विकास मंच चे अध्यक्ष प्रविण गोंडे व राजे छ. संभाजी महाराजांच्या प्रतिमेला जेष्ट मान्यवर भरतजी साळवे यांच्या हस्ते पुष्पहार, पुष्प अर्पण करण्यात आला. तंदनंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन व राजे संभा जीचा जय घोष करित उपस्थित सर्वानी पुष्प अर्पण व अभिवादन केले.
छात्रवीर संभाजी महाराज यांच्या जिवनावर डॉ पं दे रा शि परिषद राज्य उपाध्यक्ष शांतारा म जळते सर यांनी मार्गदर्शन करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम रहाटे, प्रेमदास साखरे, वामन तिडके, कन्हान शहर विकास मंचचे उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव अभिजीत चांदुरकर , संजय रंगारी, प्रविण माने, हरि ओम नारायण, नितीन मेश्राम, रंजनिश उर्फ बाळा मेश्राम, सोनु मसराम, शारूख खान, अखिलेश मेश्राम, चंदन मेश्राम, महेश शेंडे आदी उपस्थित होते.
