Published On : Fri, Jun 21st, 2019

ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात अंतर्राष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

कामठी:- येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र येथे 21 जून अंतर्राष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.याप्रसंगी मन बुद्धि चे संबंध त्या सर्वशक्तिमान परमसत्ता च्या सोबत जोडून स्वतःला सशक्त बनविणे यालाच राजयोग असेम्हणतात. योग केल्याने मनाची एकाग्रता सह मन बुद्धि ला नियंत्रित केल्या जाते ज्यामुळे आमच्या संस्कारात बदल घडून येतात व जेव्हा संस्कार शुद्ध होतात तेव्हा या स्थूल कर्मेंद्रियों च्या पेक्षाही श्रेष्ठ कर्म होतात

ज्यामुळे मानवाचे मन शुद्ध एवं सात्विक बनते व मनाचा प्रभाव शरीरावर पडल्याने शरीर पन स्वस्थ बनतो। जेव्हा शरीर व मन स्वस्थ असते तेव्हा स्वस्थ समाजाचा निर्माण होतो।त्यातच समाज कल्याण व सोबतच देशाचा विकास समावेश असल्याचे मौलिक विचार कामठी सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी प्रेमलता दीदी यांनी आपल्या वक्तव्यातून व्यक्त केले तसेच आजच्या स्थितीत व्यक्ती आज चिंता, भय, तणाव व अशांती मुळे चिडचीडग्रस्त होतात ज्यामध्ये औषधे सुद्धा अनुपयोगी होतात परंतु योगा-मेडिटेशन एस अशी विधी आहे जो प्रत्येक व्यक्ती साठी अमृत चे काम करीत असतात यासाठी प्रत्येक व्यक्तीने योगा मेडिटेशन शिकणे गरजेचे आहे जो आम्हा सर्वाना स्वस्थ निरोगी जीवन देत स्वस्थ समाज निर्माण होन्यास सहाययपूरक ठरणार आहे., यावेळी ब्राह्मकुमारी प्रेमलता दीदींनी राजयोग चे प्रशिक्षण दिले. तसेच सर्वाना योगासन प्राणायाम करवून घेतले.

याप्रसंगी ,पंचायत समिति सदस्य . विमलताई साबळे,जोगेंद्र वाघमारे,घनश्याम चकोले , सतीश महेंद्र,ब्राह्मकुमारी प्रेरणा, ब्राह्मकुमारी चंद्रकला, कविता, कांचन , शिलु, वंदना, अरुणा,आदीनि प्रामुख्याने सहभाग नोंदविला . यावेळी समस्त उपस्थितांनी दररोज एक तास आसन प्राणायाम सह राजयोग चा अभ्यास करण्याचा संकल्प केला.

संदीप कांबळे कामठी