Published On : Fri, Jun 21st, 2019

आंतरराष्ट्रीय योगदिन निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रम

नगर परिषद काटोल, अरविंद सहकारी बॅंक, राष्ट्रीय छात्रसेना, नबिरा महाविद्यालय येथे आयोजन

काटोल :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात सत्तापक्ष गटनेते चरणसिंग ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद प्रांगणात , माजी आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन समोर मेनरोड, तर २० महाराष्ट्र बटालियन नागपूर अंतर्गत राष्ट्रीय छात्र थलसेना व ४ महाराष्ट्र नेवल युनिट नौसेना काटोल व नरखेड तालुक्यातील नबिरा महाविद्यालय काटोल, पंढरीनाथ महाविद्यालय नरखेड, बनारसीदास रुईया हायस्कूल काटोल, जि. प. माजीशासकीय मुलांची शाळा काटोल, नगर परिषद हायस्कूल काटोल सर्व महाविद्यालय व शाळा तसेच यांचा संयुक्त योग दिनाचा कार्यक्रम नबिरा महाविद्यालयाच्या डोम मध्ये संपन्न झाला योगप्रशिक्षक व राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी डॉ. तेजसिंह जगदळे, प्राचार्य डॉ नविन, प्रा. यावलकर, प्रा. डाॅ. अजय शर्मा, प्रा. प्रदीपकुमार तिवारी, प्रा. परेश देशमुख तसेच राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी प्रभाकर भस्मे,विजय राठी,अमोल जवंजाळ, प्रमोद कोहळे, वंदना नागदेवेे आणि मोठ्या संख्येने छात्र सैनिक उपस्थित होते.

Gold Rate
24 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,000 /-
Gold 22 KT ₹ 1,06,000 /-
Silver/Kg ₹ 1,35,700/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नगर परिषद काटोल येथे सत्तापक्ष गटनेते चरणसिंग ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली योगदिन साजरा करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर, आरोग्य सभापती किशोर गाढवे, शिक्षण सभापती देविदास कठाणे, मुख्याधिकारी अशोक गराटे तसेच मोठ्या संख्येने कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

नगर परिषद दुकान संकुलासमोर मुख्य रस्त्यावर माजी आमदार डॉ आशिष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत अरविंद सहकारी बॅंकेच्या सौजन्याने योगदिन साजरा करण्यात आला यावेळी योगाचार्य डॉ. तेजसिंह जगदळे व अशोक कडु, परेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Advertisement
Advertisement