Advertisement
नागपूर: भारताच्या 77 व्या स्वातंत्र दिनानिमित्त महावितरणच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन या प्रादेशिक कार्यालयाच्या प्रांगणात प्रादेशिक संचालक श्री सुहास रंगारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी महावितरणच्या सांघिक कार्यालयातील मुख्य अभियंता (सामुग्री व्यवस्थापन) श्री मनिष वाठ, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री दिलीप दोडके, अधीक्षक अभियंते सर्वश्री हरिश गजबे, अमित परांजपे, राजेश नाईक, अजय खोब्रागडे, मंगेश वैद्य, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री प्रदिप सातपुते, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री सचिन लहाने यांच्यासह महावितरण, महानिर्मिती व महापारेषणचे आधिकारी, अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.