Published On : Mon, Oct 11th, 2021

म.न.पा च्या सहारा शहरी बेघर निवार्यारत जागतिक बेघर दिन साजरा

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिका, दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मनपाच्या समाजकल्याण विभागांतर्गत संचालिता टेकडी गणेश मंदिर रेल्वे पुलाखाली सहारा शहरी बेघर निवारा येथे जागतिक बेघर दिनाचा कार्यक्रम रविवारी (ता. १०) साजरा करण्यात आला.

नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, उपायुक्त राजेश भगत, समाजकल्याण अधिकारी दिनकर उमरेडकर यांच्या मार्गदर्शनात १ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या काळात जागतिक बेघर दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात आले. रविवार झालेल्या कार्यक्रमाला नगरसेवक किशोर जिचकार, नवलाई शहर संस्थेच्या अध्यक्षा बेबीताई रामटेके, समाजकल्ळाण विभागाचे विनय त्रिकोलवार, परी फाऊंडेशनचे अध्यक्ष सौरभ मोहल्ले, सहारा बहुउद्देशीय संस्७चे सचिव देवेंद्र गाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर बेघर लाभार्थ्यांकडून केक कापण्यात आला. म.न.पा आरोग्य विभाग मंगळवारी झोन क्रं. १० आणि सहारा बहुउद्देशीय संस्था व परी फाउंडेशनकडून लाभार्थ्यांचे कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. सहारा शहरी बेघर लाभार्थ्यांचे आधार कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक व मतदाता ओळखपत्र अतिथींच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सचिव देवेंद्र गाडे यांनी अतिथीचे आभार मानले. कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती मोनिका फुलमाळी, व्यवस्थापक वसंत रंगारी, काळजीवाहक रवींद्र तेलगोटे, प्रेम घरडे, प्रशांत बन्सोड यांच्यासह शहरी बेघर लाभार्थी उपस्थित होते.