Published On : Fri, Nov 29th, 2019

समता सैनिक दल कन्हान चा १२ वा वर्धापन दिन साजरा

कन्हान : – समता सैनिक दल शाखा, कन्हान चा १२ वा वर्धापन दिन बुद्ध विहार गणेश नगर येथे ध्वजारोहण व बुद्ध वंदना, जय भिम सैलुट सह थाटात साजरा करण्यात आला.

गुरुवार (दि.२८) बुद्ध विहार गणेश नगर कन्हान येथे सकाळी ७ वाजता समता सैनिक दल शाखा कन्हान व्दारे शाखेच्या आयु.सुलोचना फुलझेले यांच्या हस्ते ध्वजारोहण व माहात्मा जोतीबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, मान वंदना करून बुध्दवंदना घेण्यात आली. तद्नंतर बुध्द विहारा पासुन ते डॉ. बाबा साहेब आंबेडकर चौकापर्यंत पथसंचाल न केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण, जय भिम सैल्युट व भिम स्मरण करण्यात आले.

सायंका ळी ५ वाजता ध्वजाला सैलुट करून माधोराव सोमकुवर यांच्या हस्ते ध्वज उतरवुन जय भिम च्या जयघोषात समता सैनिक दल शाखा कन्हान चा १२ वा वर्धापन दिन थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाखाप्रमुख गोपाल गोंडाणे, माधोराव सोमकुंवर, सिंधुताई वाघमारे, अनिता तांबे, सुलोचना फुलझे ले, सुमित्रा गजभिये, मनुकला वाघमारे, कल्पना फुलझेले, तुळजाताई रामटेके, नमिता फुलझेले, सुजाता नितनवरे, अनिता दुपारे, अनिता चंहादे, शकुंतला मेश्राम, रमा वासनिक, निर्मला शेंडे, कमला गडपायले, आर्यन मेश्राम, मनिष मेश्राम, सोमा वासनिक सह कराटे प्रशिक्षणार्थी श्रेया रासेगावकर, टिनु रासेगावकर,आरूष मेश्राम, शौर्य मेश्राम, सिध्दार्थ फुलझेले, आयुष येरणे, अतुल येरणे, ओवी पाटील, निधी पाटील, क्रिश नायडु आणि बहुसंख्येने समता सैनिक उपस्थित होते. रॉबिन निकोसे यांनी फोटो सेशन ची कामगीरी बजावली.