Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Nov 29th, 2019

  जनतेच्या हितासाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाने कार्यरत राहावे:जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

  तहसील कार्यालय व नगरपरिषद येथे जिल्हाधिकारी यांनी केला दौरा

  रामटेक: तहसील कार्यालय व नगरपरिषद येथे नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नुकताच रामटेकचा दौरा केला.तहसील कार्यालय व नगरपरिषद येथे भेट देऊन तेथील समस्यांचा आढावा घेतला.

  जनतेची कामे करतांना अनेक अडचणी येतात पण या अडचणी व समस्येवर त्वरित तोडगा काढून तसेच जनतेच्या हितासाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाने कार्यरत राहावे असे विचार व्यक्त केले.

  सर्वात आधी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी महात्मा फुले यांचे फोटोला अभिवादन केले . ह्याप्रसंगी उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे तहसीलदार बाळासाहेब मस्के व नायब तहसीलदार व कर्मचारी गण उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145