कन्हान : – नगरपरिषद कन्हान-पिपरी च्या परिसरात मा. रविंद्रजी ठाकरे जिल्हाधिकारी नागपुर यांचे कन्हान शहरात आगमना निमित्त रिपब्लिकन भिमशक्ती महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने भारतीय संविधान व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून निवेदन देण्यात आले.
नगरपरिषद कन्हान-पिपरी च्या प्रागंणात नागपुर जिल्हा जिल्हाधिकारी मा रविंद्र ठाकरे यांचे पहिल्यांदा आगमन होताच रिपब्लिकन भिमशक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे हयानी भारतीय संविधान व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आणि पारशिवनी तहसिल अंतर्गत येणाऱ्या कृषिक जमिनीचे अकृषिक करण्याकरिता भ्रष्टाचार केल्या संदर्भात निवेदनातुन माहिती देण्यात आली व परिसरातील महत्वपूर्ण समस्यां वर चर्चा करण्यात आली.
समस्या ऐकुण त्यावर लवकरात लवकर निदान करण्या चे अश्वाशन मा. जिल्हाधिकारी ठाकरे साहेब यांनी दिले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटियार, मुख्यधिकारी सतीश गावंडे, उपजिल्हाधिकारी सह अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
रिपब्लिकन भिमशक्ती च्या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर भिमटे, नितीन मेश्राम, रोहित मानवटकर, अखिलेश मेश्राम, निखिल रामटेके, जयेश रामटेके, विवेक पाटील, स्वप्नील नितनवरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.