Published On : Tue, Nov 26th, 2019

सालवा येथे रा.से.यो च्या वतीने “संविधान दिवस” उत्साहात साजरा

कन्हान : – श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्ट्स सालवा येथे राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने “संविधान दिवस” साजरा करण्यात आला.

मंगळवार (दि.२६) ला संविधान दिवस कार्यक्रम महाविद्यालया च्या कार्यकारी प्राचार्या डॉ.सुप्रिया रा.पेंढारी यांच्या अध्यक्षेत, प्रमुख पाहुणे प्रा. कु. पल्लवी ठाकरे, प्रा. ठाकरे यांनी संविधान लिखाण कालावधी, संविधाना मध्ये नमूद माहिती विषयी प्रकाश टाकुन मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ.सुप्रिया पेंढारी हयांनी संविधा नाचा आजच्या काळात होत असलेल्या अपमानावर दु:ख व्यक्त केले.

कार्यक्रमा मध्ये संविधानाची शपथ घेण्यात आली आणि संंविधान प्रास्तविकाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सारिका सूर्यवंशी यांनी करून सूत्र संचालन महाविद्यालयातील रा.से.यो अधिकारी प्रा.गोरे सर यांनी तर आभार प्रदर्शन विद्यार्थीनी कु.प्रिया भोले हिने केले. कार्यक्रमाला प्रा.आर.डी.ढोरे, श्री रामेश्वर नागपुरे, मिखीलेश दरवाडे, डीमू महल्ले, खुशाल शेंडे, सौ.रेखा शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.