Published On : Wed, Nov 27th, 2019

प्रहार दिव्यांग/अपंग क्रांती मोर्चा कन्हान व्दारे संविधान दिवस साजरा

कन्हान : – प्रहार दिव्यांग/अपंग क्रांती मोर्चा कन्हान व्दारे प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ संविधान दिवस साजरा करण्यात आला.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व संविधानास प्रहार दिव्यांग/अपंग क्रांती मोर्चा कन्हान च्या दिव्यांगा नी माल्यार्पण करून सामुहिक संविधान प्रास्तविकेचे वाचन करून संविधान दिवस साजरा करण्यात आला.

याप्रसंगी प्रहार दिव्यांग/अपंग क्रांती मोर्चा कन्हान चे राजु राऊत, प्रविण शेंडे, सागर फरकाडे, मंगेश नितनवरे, प्रवीण माने, अश्विन भिवगडे, सुभाष मेश्राम, जयवंत थोरात, राजेश्वरी ओडियार, पिंकी श्रीवास्तव, वनिता मेश्राम, दुर्गा गोवर, रंगराव ठाकरे, योगेश धावडे, नवनाथ शेंडे, जयेश रामटेके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.