Published On : Tue, Nov 26th, 2019

धर्मराज प्राथमिक शाळेत गीत गायनाद्वारे संविधान दिन साजरा

कन्हान : – येथील धर्मराज प्राथमिक शाळेत आज (दि.२६) संविधान दिन गीत गायनाद्वारे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्याप क आशा हटवार तर प्रमुख पाहुणे म्हणून भिम गीत गायक श्री मुन, आत्माराम बावनकुळे, भिमराव शिंदेमेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. तद्नंतर सामुहिक संविधान प्रास्ताविका चे वाचन करण्यात आले. श्री मुन यांनी संविधान जागृती संदर्भातील गीत, हसा मुलांनो हसा, देशभक्ती गीत सादर केले. या गितांच्या माध्यमातून संविधान जागृती संदर्भातील मोलाचे कार्य केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन खिमेश बढिये यांनी तर आभार अमित मेंघरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चित्रलेखा धानफोले, प्रिती सेंगर, पुजा धांडे, शारदा समरीत, अपर्णा बावनकुळे, किशोर जिभकाटे यांनी सहकार्य केले.