Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Nov 15th, 2019

  साई-सावली वृद्धाश्रमात बालक दिन साजरा

  नागपुर– बालकदिनानिमीत्य* *साई-सावली वृद्धाश्रम* व *किडस्जी स्कुल* याच्या सयुंक्त विद्यमाने वृद्धाश्रमात बालकदिनाचा कार्यक्रम अतिशय हर्षोल्लात सादर करण्यात आला.

  या कार्यक्रमाला माननिय अजनी भाग संघचालक श्री.डॉ. मा. रमाकांतजी कापरे यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमादरम्यान बालकांचे व वृद्धांचे समन्वयाव्दारे हितगूज साधन्याचा प्रयत्न करण्यात आला.

  कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व वृद्धांनी अशा नवख्या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी वृद्धांना विवीध प्रकारच्या भेट वस्तु व वृद्धांनी विद्यार्थ्यांना भारत-भारतीचे पुस्तके वाटण्यात आले.

  वरील अशा अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन साई-सावली वृद्धाश्रमाच्या सचिव नगरसेविका सौ. विशाखा मोहोड व किडस्जी स्कुलचे संचालक श्री. अमितजी दिक्षीत यांनी केले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145