नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने अखेर बारावी 2025 चा निकाल जाहीर केला आहे. मंडळाने अधिकृत प्रेस नोटद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली असून, निकाल आज (१३ मे) सकाळच्या सत्रात जाहीर करण्यात आला. यंदा ८८.३९% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा यशाचे प्रमाण थोडे वाढले आहे.
सध्या cbseresults.nic.in आणि results.cbse.nic.in या अधिकृत वेबसाइट्सवर निकालाची लिंक अद्याप सक्रिय झालेली नाही. मात्र, CBSE कडून सांगण्यात आले आहे की लवकरच विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाई न करता थोडा संयम बाळगावा.
१६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा-
CBSE च्या बारावीच्या परीक्षेला यावर्षी संपूर्ण देशभरातून १६ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. विज्ञान, वाणिज्य व कला या सर्व शाखांचे निकाल एकत्रितपणे जाहीर करण्यात आले आहेत.
निकाल पाहण्यासाठी आवश्यक गोष्टी-
विद्यार्थ्यांनी खालील गोष्टी तयार ठेवा:
आपला रोल नंबर
शाळेचा कोड
प्रवेशपत्रावरील अन्य तपशील
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे-
cbseresults.nic.in
results.cbse.nic.in
DigiLocker: विद्यार्थ्यांना निकाल डिजिलॉकर अॅप किंवा वेबसाइटवरून सुद्धा पाहता येईल.
SMS सेवा: CBSE कडून SMS द्वारे निकाल पाहण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते. संबंधित तपशील लवकरच CBSE च्या वेबसाइटवर प्रसिद्ध होणार आहेत.
महत्त्वाची सूचना:
CBSE ने विद्यार्थ्यांना घाईगडबड न करता संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. निकालाची लिंक सक्रिय झाल्यानंतर ती अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थ्यांनी फसवणूक करणाऱ्या खोट्या वेबसाइट्सपासून सावध राहावे.