नवी दिल्ली – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) दहावीचा निकाल आज, १३ मे २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान पार पडली होती. निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. यंदा एकूण ९३.६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्रिवेंद्रम विभागाने पुन्हा एकदा अव्वल क्रमांक पटकावला आहे.
या वर्षी २३ लाख ८५ हजार ७९ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, तर प्रत्यक्षात २३ लाख ७१ हजार ९३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २२ लाख २१ हजार ६३६ विद्यार्थी उत्तीर्ण ठरले. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षा केंद्रांची संख्याही वाढवण्यात आली होती. एकूण ७ हजार ८३७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.
सीबीएसईच्या विविध विभागांतील निकाल खालीलप्रमाणे आहे:
त्रिवेंद्रम – ९९.७९%
विजयवाडा – ९९.७९%
बेंगळुरू – ९८.९०%
चेन्नई – ९८.७१%
पुणे – ९६.५४%
अजमेर – ९५.४४%
दिल्ली पश्चिम – ९५.२४%
दिल्ली पूर्व – ९५.०७%
चंदीगड – ९३.७१%
पंचकुला – ९२.७७%
भोपाळ – ९२.७१%
भुवनेश्वर – ९२.६४%
पाटणा – ९१.९०%
डेहराडून – ९१.६०%
प्रयागराज – ९१.०१%
नोएडा – ८९.४१%
गुवाहाटी – ८४.१४%
विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहण्यासाठी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट्सवर जाऊन रोल नंबर आणि इतर तपशील भरावे लागतील. निकाल पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना डिजिटल स्वरूपात मार्कशीटही डाउनलोड करता येईल.
निकाल पाहण्याची संकेतस्थळे:
cbseresults.nic.in
cbse.gov.in