Published On : Sat, Jun 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात आलू-कांद्याच्या पोत्यांआड सुरू होती गांजाची तस्करी; 31.5 किलो गांजा जप्त

- 23 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Advertisement

नागपूर : आलू आणि कांद्याच्या पोत्यांमध्ये गांजा लपवून तस्करी करणाऱ्या रॅकेटचा नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत पोलिसांनी तब्बल 31 किलो 500 ग्रॅम गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती-नागपूर रोडवरील एका हॉटेलसमोर संशयास्पद मालवाहू ट्रक उभा असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ट्रकची तपासणी केली. यावेळी आलू आणि कांद्याच्या पोत्यांमध्ये लपवून ठेवलेला 31.5 किलो गांजा आढळून आला.

Gold Rate
Aug 4 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 43,400 /-
Gold 22 KT ₹ 1,33,100 /-
Silver/Kg ₹ 2,21,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कारवाईत पोलिसांनी ट्रक चालक मोहम्मद शफीक मोहम्मद जहरुद्दीन खान (वय 32, गुजरात) याला अटक केली. चौकशीत हा गांजा अयाज खान याचा असल्याचे समोर आले. उत्तर प्रदेशातून हा गांजा नागपुरात आणण्यात आला होता.

तपासात आणखी धक्कादायक माहिती उघड झाली. दोन दिवसांपूर्वी कलमना भाजी मार्केटमध्ये ट्रकमधील आलू आणि कांद्याची पोती उतरवण्यात आली होती. मात्र गांजाची डिलिव्हरी होऊ शकली नव्हती. त्यानंतर ट्रक अमरावती रोड परिसरातील एका ट्रान्सपोर्ट कंपनीत पोहोचताच पोलिसांनी छापा टाकून चालकाला रंगेहात पकडले. मात्र मुख्य सूत्रधार अयाज खान घटनास्थळावरून पसार झाला.

Advertisement

या कारवाईदरम्यान पोलिसांनी 7 लाख 87 हजार रुपयांचा गांजा, मोबाईल फोन आणि सुमारे 15 लाख रुपयांचा मालवाहू ट्रक असा एकूण 23 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तस्करीच्या जाळ्यामागील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.

Advertisement
स्कॉर्पियो में किडनैप... 7 किलोमीटर दूर ले जाकर थर्ड डिग्री... #nagpurnews #crime #policeaction

स्कॉर्पियो में किडनैप... 7 किलोमीटर दूर ले जाकर थर्ड डिग्री... #nagpurnews #crime...

छात्र मुद्दे पर Youth Congress का प्रदर्शन | 'Amit Shah Jawab Do' बैनर #nagpurnews #politics

छात्र मुद्दे पर Youth Congress का प्रदर्शन | 'Amit Shah Jawab Do'...

हर घर तिरंगा अभियान का भव्य आगाज; शहर में वितरित होंगे 1.75 लाख तिरंगे

हर घर तिरंगा अभियान का भव्य आगाज; शहर में वितरित होंगे 1.75...

40 लाख की प्लॉट ठगी का नया केस दर्ज, सक्करदरा पुलिस करेगी पूछताछ

40 लाख की प्लॉट ठगी का नया केस दर्ज, सक्करदरा पुलिस करेगी...

2009 सीडी मामले में उद्धव ठाकरे का बयान #MaharashtraNews  #UddhavThackeray #ShivSena #Political

2009 सीडी मामले में उद्धव ठाकरे का बयान #MaharashtraNews #UddhavThackeray #ShivSena #Political

बिना दस्तावेज मध्य प्रदेश की बस जब्त #MaharashtraNews #STBus #RTO #BusChecking #MPBus #TrafficNews

बिना दस्तावेज मध्य प्रदेश की बस जब्त #MaharashtraNews #STBus #RTO #BusChecking #MPBus...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges