Published On : Thu, Dec 26th, 2019

रामटेक नगर परिषदेने लावलेला विशेष स्वच्छता कर रद्द

Advertisement

काँग्रेस नगरसेवक दामोदर धोपटे यांच्या प्रयत्नांना यश

रामटेक: रामटेक नगर परिषदेने सन 2018 पासून मालमत्ता करामध्ये विशेष स्वच्छता कर लावला होता आणि मोठया प्रमाणावर घर टॅक्स वाढविले होते.यामुळे रामटेककर नागरिक प्रचंड संतापलेले होते.

त्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक दामोदर धोपटे यानी पत्र लिहून अन्यायकारक कर रद्द करण्याची मागणी केली होती.आणि हा कर रद्द केला नाही तर उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला होता.

त्यामुळे नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांनी विशेष सभेची सूचना काढली. यामध्ये चर्चा करून रामटेकच्या नागरिकांच्या भावनांचा आदर ठेवून याच चालू आर्थिक वर्ष 2019-20पासूनच कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे व ज्या काही नागरिकांनी हा कर भरलेला असेल त्यांच्या रकमेचे समायोजन 2020-21च्या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता करात करण्यात यावेत .असा ठराव पारित करण्यात येऊन याबाबतची अंमलबजावणी कर विभागाने करण्याचे निर्देश दिले आहेत.

विशेष स्वच्छता कर कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय 24 डिसेंबर मंगळवारी झालेल्या विशेष सभेत एकमताने घेण्यात आल्याने रामटेककर नागरिकांवर बसणारा प्रचंड आर्थिक भुर्दंड वाचलेला असून नगरसेवक दामोदर धोपटे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.