Published On : Thu, Dec 26th, 2019

१०२ कोटींच्या वसुलीकरिता ८३६ खाते गोठविले

मनपाच्या स्थानिक संस्था कर विभागाची कार्यवाही

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाद्वारे वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. सुमारे १०२ कोटींच्या वसुलीकरिता ८३६ व्यावसायिकांचे बँक खाते गोठविण्यात आले आहेत.

मनपाच्या स्थानिक संस्था कर विभागाद्वारे आर्थिक वर्ष २०१३-१४ करिता व्यावसायिकांनी सादर केलेल्या विवरणपत्रांच्या निर्धारणांती ६३८ प्रकरणांत ८१ कोटी ६६ लाख ८४ हजार ३५५ रुपयांची मागणी निर्धारीत करण्यात आलेली आहे.

आर्थिक वर्ष २०१४-१५ करिता सादर केलेल्या विवरणपत्रांच्या निर्धारणांती १९८ प्रकरणांत २० कोटी २६ लाख ५८ हजार ३०४ रुपयांची मागणी निर्धारीत करणञयात आलेली आहे. अशा एकूण ८३६ प्रकरणांत १०१.९३ कोटी रुपयांची मागणी आहे.

व्यावसायिकांनी सदरहू निर्धाणांची दखल न घेतल्याने स्थानिक संस्था कर विभागाद्वारे संबंधित व्यावसायिकांचे बँक खाते गोठवून वसुलीची कार्यवाही प्रभावी करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक संस्था कर विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली.