नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून सुभाष चौधरी यांना निलंबित करण्याचा वादग्रस्त आदेश अवैध ठरवून रद्द करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी यासंदर्भात निर्णय दिला. हा कुलपती रमेश बैस यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो.कुलपती या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व मुकुलिका जवळकर यांनी विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला.बैस यांच्या कार्यालयात चाैधरी यांच्याविरुद्ध विविध तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
त्यावर सखोल चौकशी पूर्ण होतपर्यंत चौधरी यांना निलंबित करण्यात आले होते. याविरुद्घ चौधरी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका मंजूर करण्यात आली. विद्यापीठाने काळ्या यादीत टाकलेल्या एमकेसीएल कंपनीला कंत्राट देणे यासोबतच अनेक तक्रारी चौधरी यांच्याविरुद्ध आहेत.