Published On : Sat, Aug 31st, 2019

तान्हा पोळ्याच्या माध्यमातून लहान मुलांना कृषी संस्कृतीची शिकवण दिली जाते:-सरपंच बंडू कापसे

Advertisement

कामठी :-शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सन हा पोळा असून बैलपोळा व तान्हापोळा असा सन साजरा होण्याची महाराष्ट्रीयन संस्कृती अजूनही कायम आहे तर खैरी गावात 1988 पासून सव्वा दोन रुपयाच्या लोकवर्गणीतून कवडुजी कडू यांनी सुरू केलेली तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा ही अजूनही कायम आहे .

तान्हापोळा हा बहुतेक लहान मुलाच्या विरंगुळ्यासाठी साजरा करण्याची प्रथा आहे लहान मुलं या दिवशी लाकडी , मातीच्या नंदीबैलाना सजवून घरोघरी जातात व त्यांना काही दक्षिना देत व तोंड गोड करीत स्वागत केले जाते मात्र या तान्हापोळ्याच्या माध्यमातून लहान मुलांना कृषी संस्कृतीची शिकवण देत असल्याचे मौलिक प्रतिपादन खैरी ग्रा प चे सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे यांनी खैरी येथिल हनुमान मंदिर समोरील प्रांगणात आयोजित तान्हा पोळा कार्यक्रमात व्यक्त केले.

तान्हापोळ्या निमित्त सहभागी समस्त बालकांना गोड मिठाई वितरण करीत तान्हापोळा साजरा करण्यात आला. तर यातील उत्तम वेशभूषा, उत्तम रंगरंगोटी, उत्तम संदेश अश्या तीन गटातील प्रत्येकी पाच बालकांची निवड करून त्यांना विशेष बक्षीस देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

याप्रसंगी उपसरपंच विनाताई रघटाटे, ग्रा प सदस्य दिलीप ठाकरे,नत्थु ठाकरे, हृदय सोनवणे, दिनेश मानकर, विजयाताई शेंडे, प्रीती मानकर, छायाताई कानफाडे,माजी सरपंच नथथु रघटाटे,अभिमन ठाकरे, मुरलीधर ठाकरे, ताराचंद ठाकरे, रमेश ठाकरे, पराग शेंडे, रुपेश ठाकरे, बंडू शेंडे, मुरली तळेकर, पुंडलीक तळेकर, कुणाल शेंडे, पत्रकार नंदू कोल्हे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी