Published On : Wed, Jun 6th, 2018

केंद्र सरकारने केले साखर उत्पादकांसाठी ८५०० कोटींचे पॅकेज जाहीर

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर उत्पादकांसाठी ८५०० कोटींचं बेलआऊट पॅकेज जाहीर केले आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत या पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे.

या ८५०० कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये ४५०० कोटी रुपयांच्या सॉफ्ट लोनचाही समावेश आहे. त्याचा उपयोग इथेनॉल प्रोडक्शनच्या कॅपॅसिटीत केला जाणार आहे. त्याशिवाय ३ मिलियन टन स्टॉकच्या पुरवठ्यावरही या पॅकेजमध्ये जोर देण्यात आला आहे. तसेच सरकारने १३०० कोटींचं कर्ज सबव्हर्जनसाठी ठेवलं आहे.

Gold Rate
11 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,300 /-
Gold 22 KT ₹ 1,01,600 /-
Silver/Kg ₹ 1,25,200/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या पॅकेजनुसार, १२०० कोटी रुपये बफर स्टॉकसाठी ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, उस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत देणी भागवण्यासाठी केंद्र सरकार साखर उद्योजकांसाठी ८००० कोटींचं विशेष पॅकेज जाहीर करणार असल्याचं केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होतं.

केंद्राने आज जाहीर केलेल्या या पॅकेजमुळे साखर उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement
Advertisement