Published On : Mon, Jul 13th, 2026
By Nagpur Today Nagpur News

बुटीबोरी-नागपूर मार्गावर रस्ता विचारण्याचा बहाणा अन् १.२६ लाखांची लूट; दोघांना एलसीबीकडून अटक!

Advertisement

नागपूर : बुटीबोरी-नागपूर मार्गावर रस्ता विचारण्याच्या बहाण्याने कार अडवून दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवत सुमारे १ लाख २६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अफरोज पठाण आणि रामेश्वर पगार अशी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत हजारे हे पत्नी आणि मुलीसह कारने नागपूरहून बुटीबोरीकडे जात होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी रस्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांची कार थांबवली. त्यानंतर आरोपींनी चाकूचा धाक दाखवत सुशांत हजारे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. लुटलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे १.२६ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घटना घडल्यानंतर आरोपी नागपूरच्या दिशेने फरार झाले. मात्र, या संपूर्ण प्रकारात दाम्पत्याच्या मुलीने प्रसंगावधान राखत मोबाईलवर संपूर्ण घटना चित्रीत केली. या व्हिडिओमध्ये आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत असल्याने तपासाला महत्त्वाचा धागा मिळाला.

स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक पुरावे आणि मोबाईलमधील व्हिडिओच्या आधारे वेगाने तपास करत अफरोज पठाण आणि रामेश्वर पगार या दोघांना अटक केली. पोलिसांकडून त्यांची सखोल चौकशी सुरू असून, या आरोपींचा इतर लुटीच्या घटनांशी काही संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.