Published On : Wed, Jun 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात फर्जी पत्रकार अन् क्राइम ब्रँच अधिकारी बनून व्यापाऱ्याला धमकी; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Advertisement

नागपूर : शहरातील कलमना परिसरात एका सुपारी व्यापाऱ्याला स्वतःला पत्रकार आणि क्राइम ब्रँचचा अधिकारी असल्याचे सांगून धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कलमना पोलिसांनी चार जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलमना परिसरात “त्रिशक्ती” नावाने सुपारीचा व्यवसाय करणारे व्यापारी दीपक दरयानी यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, मंगळवारी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास गौरव पांडे, सूरज बैस, नरेंद्र चौबे आणि जितेंद्र नावाचे चार जण त्यांच्या दुकानात आले.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी दोघेजण दुकानाचे व्हिडिओ चित्रीकरण करू लागले, तर अन्य दोघांकडे पत्रकारितेची ओळखपत्रे होती. त्यापैकी एका व्यक्तीने स्वतःला क्राइम ब्रँचचा अधिकारी असल्याचे सांगितल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करून गोदाम सील करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, चौघांनी अश्लील शिवीगाळ करत दबाव टाकण्याचा आणि धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर त्यांनी तत्काळ ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली.

Advertisement

तक्रारीच्या आधारे कलमना पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून प्राथमिक तपासात आरोपींपैकी तिघांवर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींची भूमिका तपासली जात आहे.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges