Published On : Sat, Aug 31st, 2019

रामटेक नगरीत बैल पोळा उत्साहात साजरा

रामटेक: रामटेक नगरीत बैल पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. माँ कालंका मंदीर,लंबे हनुमान मंदिर,सुभाष वॉर्ड, नगर परिषद रामटेकच्या वतीने नेहरू मैदान येथे पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.रामटेक व आजूबाजूच्या गावातील शेतकरी बांधव आपल्या बैलजोड्या घेऊन नेहरू मैदानावरील तोरणात घेऊन दाखल झाले. यावेळी पोळ्यातील शेतकऱ्यांना नारळपान व दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला.

झडत्या झाल्यानंतर यावर्षी रामटेक नगर परिषदेचा वतीने पोड्यात शेतकऱ्यांना पोड्या निमित्त प्रोत्साहित करण्यात आले .अवी वाघूलकर व गजु चोपकर यांच्या जोडीला प्रथम व द्वितीय क्रमांक देण्यात आला. बैलजोडयाना पुरस्कृत करण्यात आले.

नगर परिषद रामटेकचे ब्रँड आंबेसिडर लक्ष्मणजी मेहर रामटेक नगरपरिषदेचे अध्यक्ष दिलीपजी देशमुख , माजी आमदार व खनिकर्म महामंडलाचे अध्यक्ष आशिषजी जैस्वाल व रामटेक नगर परिषदेचे नगरसेवक ,माजी नगरसेवक राहुल कोठेकर,अजय मेहरकुळे ,रामटेक नगरीतील नागरीक ,महिला मंडळी लहान मुले-मुली यांचीही उपस्थिती होती.बैलपोळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला