Published On : Sun, Jul 5th, 2015

बुलढाणा : युपीएससीत बुलढाणा जिल्ह्याचाही झेंडा

Advertisement


दे.राजाचा योगेश चित्ते उत्तीर्ण, देशातुन 898 रँक   

Yogesh Chitte
बुलढाणा।
भारतीय प्रशासकिय सेवेचे प्रवेशद्वार असलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परिक्षेचा निकाल आज जाहिर झाला. अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणाºया या परिक्षेत पहिल्या पाचमध्ये मुलींनी बाजी मारली असली तरीही मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्याचा झेंडाही यात फडकला आहे. देऊळगावराजा तालुक्यातील निमगावगुरु सारख्या अडवळणाच्या गावातील योगेश चित्ते हा युपीसी उत्तीर्ण झाला असुन देशातुन त्याचा रँक क्रमांक 898 वा आहे.

दहावी पर्यंतचे शिक्षण देऊळगावराजात पुर्ण करणाऱ्या या यशस्वी योगेशचे वडील सुखदेव चित्ते हे पदवीधर शिक्षक असुन भुमराळा तालुका लोणार येथे कार्यरत आहे. आई गृहिणी आहे. अकरावी बारावी लातुर येथे पुर्ण केल्यावर नांदेड येथे गुरुगोविंद कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक इंजीनिअरीग केले. 2012 ला पदवी उत्तीर्ण झाल्यावर अधिकारी होण्याचा स्वप्न पाहिलं आणि त्याचा ध्यास म्हणुन दिल्लीला तिन ते चार महिन्याचा क्लास केला आणि तेथुन पुढे पुणे येथील ज्ञानप्रबोधणीत धडे गिरवले. आज परिश्रमाचं चिझ झाल्याची प्रतिक्रिया योगेशने बोलतांना दिली. दुसऱ्या प्रयत्नात हे यश योगेश चित्ते यांनी मिळविले आहे. भविष्यात रँक सुधारण्यासाठी आपला प्रयत्न सुरुच राहणार असल्याचेही योगेशने मटाशी बोलतांना सांगितले तर योगेशचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्याने प्रामाणिक अधिकारी म्हणुन नावारुपास येवुन देशसेवा करावी, अशी प्रतिक्रिया योगेशचे वडील श्री सुखदेव चित्ते यांनी दिली. योगेश सद्या नागपूर येथे दुरदर्शन (आकाशवाणी विभागात) ट्रान्समिशन एक्झ्युकेटीव्ह दोन महिन्यापासुन कार्यरत आहे.