Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jul 2nd, 2015
  Vidarbha Today | By Nagpur Today Vidarbha Today

  बुलढाणा (चिखली) : अनुराधा मिशन व साधुवासवाणी मिशन तर्फे 363 अपंगाना कृत्रिम अवयवासह साहित्याचे वाटप


  Synthetic material distributed
  चिखली (बुलढाणा)।
  अपघात किंवा इतर कारणाने मनुष्याला हात किंवा पाय जाणे निकामी होणे ही घटना दुर्दैवीच, यामुळे कुटूंबाचा संपुर्ण भार ज्याचे खांद्यावर असतो, अशी व्यक्ती पार खचुन जाते. असे संकट कोसळलेल्या व्यक्तींना जगन्याची उभारी देणे, नैराशातुन जिवनाच्या आनंद मार्गाकडे नेणारा आशेचा किरण म्हणुजे अनुराधा परिवार सातत्याने राबवित असलेले अस्थीव्यंग तपासणी व जयपूर फुट जोडणी मिशन होय.

  या शिबीरात कृत्रिम हात व पाय यासाठी निवडण्यात आलेल्या २१३ व्यक्तींना साधणे देण्यात येत आहे, तर 150 अपंगाना 3 चाकी सायकल, वांकर, कुबड्या व कॅलीपर आदी देण्यात येत आहेत. अनुराधा मिशनच्या उपक्रमात साधुवासवाणी मिशन पुणे यांच्या समर्थ साथही लाभली आहे. अपंगांच्या जिवनात या साहित्यामुळे जिवन सुसहय करण्याची संधी या निमित्ताने प्राप्त झाली त्याची मनस्वी आनंद होतो आहे, असे उद्गार आमदार राहुल बोंद्रे यांनी 363 अपंगाना दिल्या जाणाºया साहित्य वितरण प्रसंगी बोलतांना काढले. अनुराधा मिशन व साधुवासवाणी मिशन पुणे यांच्या वतीने आ. राहुल बोंद्रे यांचे वाढदिवसानिमितत अनुराधा नगरातील महाराणा प्रताप इंनडोअर स्टेडियम मध्ये अस्थीव्यंग तपासणी व जयपूर फुट जोडणी शिबीर घेण्यात आले होते. या शिबीरात 363 अपंगाची तपासणी करुन कृत्रिम हात व पाय यासाठी 213 अपंगाची निवड करण्यात आली होती. तर 150 अपंगाना 3 चाकी सायकल, वाकर, कुबड्या आणि कॅलीपर यासाठी निवण्यात आले होते.या सर्व निवडण्यात आलेल्या अपंगांना वरील सर्व साहितय महाराणा प्रताप इंनडोअर स्टेडियममध्ये सन्मानपुर्वक आ.राहुल बोंद्रे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. या वितरण समारंभाप्रसंगी ज्यांच्या प्रेरणेने मागिल 21 वर्षापासुन रुग्णसेवा व अपंग सेवा या क्षेत्रात अनुराधा मिशन सातत्याने कार्य करत आहे, असे कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनीही उपस्थिती देवुन अपंगांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्याचबरोबर या कार्यक्रमाला डॉ.छाजेड बुलडाणा साधुवासवाणी मिशनचे डॉ.मिलींद जाधव व त्यांच्या सहकार्याने पुर्णवेळ हजेरी दिली. कार्यक्रमाचे व्यस्थापन डॉ.कैलास बियाणी व त्यांच्या सहकार्यानी केले. कार्यक्रमाला मौनीबाबा शिक्षण संस्थानचे विश्वस्त आत्माराम देशमाने, डॉ. सिध्देश्वर वानेरे, फारुखसेठ सौदागर, इजाज मंत्री, गजानन परिहार, चंद्रपालसिंह परिहार, मंडळकर यांची उपस्थिती होती.

  21 वर्षा पासुन रुग्णसेवा
  कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे, आ.राहुल बोंद्रे आणि अनुराधा परिवार मागील २१ वर्षे सातत्याने अपंग सेवा महायज्ञाच्या माध्यमातुन रुग्णसेवा करित अपंगासाठी साधुवासवाणी मिशन पुणे, सत्यसाई सेवा प्रतिष्ठाण, अपंग पुर्नवसन केंद्र, महाविर विकलांग सेवा प्रतिष्ठाण इत्यादी सेवाभावी संस्थानचा या उपक्रमास नेहमी पाठींबा व सहकार्य मिळत आल्याने आजवर जयपुर फुट जोडणी अंतर्गत 1 हजार 800 पेक्षा जास्त रुग्णांना जयपुर फुट कृत्रिम अवयव, कॅलीपर, व्हील चेअर्स, ट्रयसिकल, स्टिक, कुबड्या इत्यादी 45 लाख रुपये पेक्षा अधिक साहित्य मोफत मिशनद्वारे अपंगाना देण्यात आलेले आहे. याशिवाय अनुराधा मिशन नेत्रचिकित्सा, रोगनिदान, रक्तदान यासारखे कार्यक्रम राबविणा बरोबरच दुर्धर रोगासाठी रुग्णांना आर्थीक मदत देण्याचे काम अव्याहतपणे करत आहे. तर अनुराधा मिशनच्या वतीने आदिवासी भागात फिरते रुग्णालय रुग्णवाहिका चालविल्या जात आहे. यामुळे अनेकांसाठी अनुराधा मिशन हे आशास्थान ठरत आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145