Published On : Thu, Jul 2nd, 2015

अमरावती (तिवसा) : खचलेल्या विहिरी ऐवजी बांधलेल्या विहिरीला मंजूरी

Advertisement

तिवसा तालुक्यातील धोत्रा येथील प्रकार
शासकीय कर्मचाऱ्यांचा चुना लावण्याचा प्रयत्न
75 वर्षीय शेतकऱ्याची संबंधित विभागाकडे तक्रारी   

kuaa - Well
तिवसा (अमरावती)।
शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरींना बांधण्यासाठी शासन लाखो रुपये खर्च करणार? गाव खरच या लाखो रुपयाच्या अनुदानात नेमक्या या खचलेल्याच विहिरींची बांधकामे होतात का? असा प्रश्न धोत्रा येथील एका 75 वर्षीय शेतकऱ्याने पत्रकारांशी बोलतांना उपस्थित केला.

शासनस्तरावर धोत्रा येथे खचलेल्या विहिरीं ऐवजी बांधुन टक-टक असलेल्या विहिरीला मंजुरी देण्यात आल्याचा प्रकार त्यांनी उजेडात आणला असून याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केल्या आहेत. मनोहर ओझरकर 75 रा. शिरजगाव गोझरी असे तक्रारकर्ताचे नाव आहे. शासकीय कर्मचारीच शासनाला लाखो रुपयाचा चुना भरवा विहिरींना मंजुरात देवून लावत असल्याबाबतचा सर्व प्रकार त्यांनी संबंधित विभागाकडे तक्रारीद्वारे मांडला आहे. या तक्रारी प्रशासनाकडे सादर करून महिना होत आला आहे. मात्र या तक्रारीची साधी दखलही शासनाने न घेतल्याचे त्यांनी सांगितले.

नैसर्गिक संकटामुळे खचलेल्या विहिरींचे बांधकाम करण्यासाठी शासन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दीड लाख रुपयांचा अनुदान देते. धोत्रा माणिकग्राम येथे शेत सर्वे नं. 92 मध्ये रंगारी चे शेतातील बांधकाम करून टका-टक असलेली विहीर मंजूर झाली असल्याबाबत ची तक्रार मनोहर ओझरकर नी शासनाकडे केली आहे.

प्रशासनाने या मंजुरी दिलेल्या विहीरी पेक्षा त्यालगतच्या दोन शेतकऱ्यांच्या विहिरी तर मोठ्या प्रमाणात खचल्या आहे. मग त्यांच्या खचलेल्या विहरी का मंजूर झाल्या नाहीत? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कुठेतरी भ्रष्ट्राचार प्रवृत्तीचा उपयोग करून ती विहीर मंजूर करून घेण्याचेही तक्रारकर्त्याचे म्हणने आहे. खचलेल्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी तहसील कार्यालयात शेकडो अर्ज येतात. त्या अर्जाच्या अनुषंगाने सर्वप्रथम तलाठी व कृषी सहाय्यक त्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करतात. त्यानंतर पंचायत समिती स्तरावरील संबंधित विभागाचे कर्मचारी त्या विहिरीची पाहणी करतात.