Published On : Fri, Jul 3rd, 2015

बुलढाणा : दुकानाला आग लागुन 12 लाखांचे नुकसान


Buldhana  Fire in Electrical shop, 12 Lakhs loss
बुलढाणा।
शहरातील मुख्य भाजीपाला बाजारपेठेतील नगर पालिका कॉम्प्लेक्समधील एका दुकानाला काल 2 जुलैच्या रात्री अचानक आग लागल्याने 12 लाखांचे इलेक्ट्रीकल साहित्य जळाल्याची घटना घडली आहे.

सुधीर दिनकरराव जाधव (42) रा. केशवनगर यांचे शहरातील मुख्य भाजीपाला मार्केटमध्ये सुधीर इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इलेक्ट्रीकलचे दुकान आहे. गुरवारी12 वाजेनंतर त्यांच्या दुकानाला अचानक आग लागली. दुकानातुन धुर निघत असल्याने स्थानिकांनी दुकान मालक सुधीर जाधव यांना घटनास्थळी बोलावुन घेतले. तोपर्यंत अग्नीशमन दल पोहले होते. त्यांनी दुकानातील आग आटोक्यात आणली आग आटोक्यात आल्याने शेजारील दुकानांचे आग पसरु शकली नाही. प्राप्त माहिती नुसार सुधीर जाधव यांच्या दुकानात आग लागल्याने 15 टिव्ही, कुलर, खुर्च्या, डिव्हीडी, डिटीएच सेट आॅफ बॉक्स व इतर इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जळुन खाक झाले. या आगीमध्ये एकुण 12 लाख रुपयांचा नुकसान झाल्याची माहिती आहे.