Published On : Mon, Jul 13th, 2015

बुलढाणा : जिजामाता नगरातील भुखंडाबाबत स्थानिकांचे धरणे

Advertisement

भुखंड माफीयांचा हैदोस थांबवा- जिजामाता नगरातील अबाल वृध्दांची मागणी

Gajanan Dhante
बुलढाणा।
शहरातील जिजामाता नगर आणि शिक्षक कॉलनी या परिसरातील भुखंडा संदर्भातील प्रकरणाबाबत स्थानिकांचा जन आक्रोश उफाळुन आला आहे. हा भुखंड अकृषक आदेशातील असुन विकण्याचा अधिकार नसल्याने ही जागा वाचावी, अशी मागणी करत परिसरातील नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी दिलेल्या या निवेदनात नमुद आहे की, शहरातील शिवाजी शिक्षक कॉलनी, जिजामाता नगर निवासी अकृषक प्रकरण हे 1970-71 मध्ये मंजुर झालेले आहे. सदर ले-आऊटच्या मंजुर प्रकरणानुसार येथील नागरिकांच्या सुविधेसाठी खुले भुखंड ठेवण्यात आले होते. त्यांचा उपयोग अनेक वर्षापासुन नागरिक करीत आहे. असे असतांना नगर परिषद बुलडाणा यांनी वाढीव हद्द विकास योजना सन 1990 मध्ये तयार केली व येथील खुल्या भुखंडावर क्रिडांगणाचे आरक्षण टाकले. वास्तविक पाहता अकृषक आदेशमधील खुला भुखंडा हा पुर्णपणे येथील नागरिकांच्या सोयीसाठी ठेवणे हे कायद्याने बंधनकारक आहे. तसेच खुला भुखंड कोणताही विकता किंवा हस्तांतरीत करता येत नाही. तसेच त्यावर कुठलेही आरक्षण टाकता येत नाही. क्रिडांगणाच्या आरक्षणाबाबतही शासनाने सन 1995 पासुनचे स्वयंस्पष्ट आदेश निर्देश असुन त्यानुसार क्रिडांगणाचे आरक्षण कोणत्याही परिस्थितीत बदलता येत नाही व वगळता येत नाही. तरी सुध्दा नगर परिषदेने आरक्षणाच्या सबबी खाली भुखंड क्र.131 व 134 मुळ अकृषक आदेशातील त्रुटीचा फायदा घेवुन मुह मालकास परत दिले.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या ठरावाबाबत तत्कालीन उपसंचालक, नगर विकास यांनी नगर परिषद बुलडाणा यांनी सुध्दा कळविले होते. यात अशा प्रकारे ठराव घेवुन क्रिडांगणाचे आरक्षण वगळता येत नाही व सदर ठराव मुख्याधिकारी न.प. यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे 308 खाली जावुन रद्द करुन घ्यावा. परंतु मुख्याधिकारी तसे न करता  नागरिकांवर अन्याय केलेला आहे. तसेच नियमाची पायमल्ली करुन शासनाचे आदेश, निर्देश डावलुन देण्यात आलेली अकृषक परवानगी रद्द करण्यात यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा दिला आहे. यानिवेदनावर भैय्यासाहेब मारोडकर, ए.डी. शिंदे, सुसर सर, संतोषराव भगत, पी.डी. सपकाळ, अ‍ॅड. साखरे, दिपक जाधव, सुनिल भुतेकर, जयदिप ताठे, संजय मोगल, जय•ाारत अपार, अजय बिलारी, कुसूम अपार, अरविंद शिंदे, मालनी शिंदे, अर्जुन थिगळे, उशा बांगर, अनिल पवार, मंगला पवार, स्वरुपचंद देशलहरा, सुनिल सपकाळ, पुष्पाबाई सपकाळ, कमल पांचाळ, अनिता इंगळे, हेमंत खेडेकर, राकेश जाधव, वैशाली पवार, जनाबाई पवार, परशराम हजारे, अन्नपुर्णा धंदर, सुनिल धंदर, विष्णू इंगळे, बाळु धुड, मधुकर जाधव, राकेश जाधव उपस्थित होते.

Advertisement
Advertisement