Published On : Fri, Jul 5th, 2019

शेवटच्या व्यक्तीपर्यंत लाभ पोहचविणारा अर्थसंकल्प : स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे

प्रत्येक घरी वीज व पाणी या योजनेमुळे देशातील शेवटच्या घटकातील व्यक्तीला लाभ मिळणार आहे. त्यामुळे देशाच्या पुढे नेण्यात गती मिळेल. सामान्यांच्या जीवनात यामुळे सुलभता येईल.

घरकुल योजनेत दोन लाख ६७ हजाराचे अनुदान वाढवून साडेतीन लाख एवढे करण्यात आले आहे.

ही स्तुत्य बाब आहे. महिलांसाठी एक लाखाच्या मुद्रा लोन देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

त्यामुळे महिला घरुनही काम करुन आर्थिकदृष्ट्या सक्षम होउ शकतील.