Published On : Tue, Sep 10th, 2019

बसपा चे नागपुरात कार्यकर्ता सम्मेलन सम्पन्न

Advertisement


नागपुर: बहुजन समाज पार्टी नागपुर शहर च्या वतीने आज 10 सप्टे रोजी उत्तर नागपुर च्या नारारोड वरील मातेश्वरी सभागृहात “कार्यकर्ता सम्मेलन व मार्गदर्शन शिबीर” चे आयोजन केले होते.

या कार्यकर्ता सम्मेलन मधे बसपा चे राष्ट्रीय महासचिव, उत्तर प्रदेश चे माजी कॅबीनेट मंत्री बसपा चे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रामअचलजी राजभर, बसपा चे राष्ट्रीय महासचिव, राज्यसभा खासदार व महाराष्ट्र प्रदेश बसपा चे प्रभारी डॉ अशोकजी सिध्दार्थ, बसपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरेशजी साखरे, प्रदेश उपाध्यक्ष कृष्णाजी बेले व प्रदेश कोषाध्यक्ष दयानंदजी किरतकर आदीनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले.

*रामअचल राजभर* : बहुजन समाजाची खरी पार्टी बीएसपी असून बाकी पार्ट्या या किरायाच्या आहेत. आपले स्वताचे घर झाल्यावर घरमालक किरायाचे घर सोडून आपल्या मालकीच्या घराचा स्वीकार करतो त्याप्रमाने बहुजन समाजाने इतर पार्ट्याचा त्याग करुण बसपा चा स्वीकार करावा. आपल्या बलावर सत्तेचे संतुलन राखून समाजहित जोपासावे असे आवाहन करुण कांग्रेस ने माउन्ट बेटन योजने अंतर्गत भारत- पाकिस्तान फाळनी करतांना बाबासाहेबा सोबत व देशासोबत केलेल्या धोकेबाजी चा प्रामुख्याने उल्लेख केला.

*डॉ अशोक सिद्धार्थ* : बहुजन समाजाची खरी शत्रु भाजपा- कांग्रेस नसून मनुवादी विचारधारा देशभर चालवीणारी नागपुरातील मनुवादी RSS असल्याचे सांगीतले. मनुवादी विचार हा विषमतेवर आधारित असल्याचे 1920 लाच बाबासाहेबांनी सांगितले होते. बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षामुलेच बहुजन समाजाला मताचा अधिकार, आरक्षण व महिलांना सन्मान मिळाला आहे. बहुजन समाजाने एक नेता, एक पार्टी, एक झेंडा, एक चिन्ह, एक कार्यक्रम या भीम मार्गाने चालले तर नक्कीच शाषक बनाल असे आश्वासन दिले.

*सुरेशजी साखरे*: कांग्रेस ने बहुजनान्ना भुल्थापा देऊन गल्ली पासून दिल्ली पर्यन्त 60 वर्षे सत्ता भोगली, बाबासाहेब आम्बेडकरांनी मतदानाचा सविधनिक अधिकार देऊन शाषक बनण्याचे स्वप्न दिले परन्तु वंचित च्या माध्यमातून मनुवादी समाजाची दिशाभूल करीत आहेत. नाग नागरीतील लोकांनी त्यापासून सावध राहून आपले आमदार जिंकविन्यसाठी झटावे असे अवाहन केले.

*दयानंद किरतकर*: नागपुर बाबासाहेबांची कर्मभूमी, कांशीरामजी यांचा त्याग व बहनजिंचा संघर्ष लक्षात ठेउन उत्तर नागपूरच्या लोकांनी विजयी रेली काढण्याचा इतिहास घडवावा असे आवाहन केले.

या प्रसंगी नागपुर झोन चे इंचार्ज मंगेशजी ठाकरे, जितेंद्रजी म्हैसकर, प्रा भाऊसाहेंब गोंडाने, तसेच जितेन्द्र घोडेस्वार, रुपेश बागेश्वर, प्रफुल्ल मानके, उत्तम शेवड़े, किशोर कैथेल, अड़ राजकुमार शेंडे, त्रिभुवन तिवारी,

जिल्हा इंचार्ज उषाताई बौद्ध, नरेश वासनिक, राजकुमार बोरकर, संदीप मेश्राम, जिल्हाध्यक्ष विलास सोमकुंवर, मनपा पक्षनेत्या वैशाली नारनवरे, झोन सभापती विरंका भिवगड़े सर्व नगरसेवक, शहर पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

बसपा नागपूर शहर सर्व विधानसभा, प्रभाग, सेक्टर, बुथ पदाधिकारी, बिव्हिएफ़, भाईचारा, नगरसेवक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन शहराध्यक्ष महेश सहारे, प्रास्ताविक महासचिव नितिन शिंगाडे ह्यांनी तर समारोप नगरसेवक नरेंद्र वालदे ह्यांनी केला. कार्यक्रमापुर्वी उत्तर नागपुरात रैली फिर्विन्यत आली. अजय पात्रे यांच्या स्फूर्ति गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उत्तम शेवड़े, कार्यालय सचिव प्रदेश बसपा

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विनोद मेश्राम, सुरेन्द्र डोंगरे, सुनंदा नितनवरे, उमेश मेश्राम, चंदशेखर भंडारे, मुकेश मेश्राम, कुलदीप लोखंडे, ममता सहारे, वंदना चांदेकर, मंगला लांजेवार, इब्राहीम टेलर, संजय बुरेवार तसेच राजेश नंदेश्वर (उत्तर), मनोज निकाळजे (पच्चिम), सागर लोखंडे (पूर्व), विनोद वंजारी (दक्षिण), राकेश गजभिये ( दक्षिण-पच्च्गिम), मिलिंद गजभिये (मध्य) ह्यांनी विशेष परिश्रम घेतले.