Published On : Tue, Sep 10th, 2019

रेल्वेगाडीच्या धडकेने कारचालक जख्मि

– सुदैवाने जीवितहानी टळली

कामठी :-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या बिडगाव येथील नागेश्वर नगर जवळील दिघोरी -भांडेवाडी नेरोगेज रेल्वे रुळावरील निर्मनुष्य रेल्वे फाटक वरून चारचाकी कार ओलांडून जात असलेल्या कार ला उमरेड कडे जात असलेल्या रेल्वे गाडीने दिलेल्या जोरदार धडकेतून घडलेल्या गंभीर अपघातात कारचालक गंभीर जख्मि झाल्याची घटना सायंकाळी 7 दरम्यान घडली असून जख्मि कारचालकला उपचारार्थ एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. सुदैवाने जीवितहानी टळली असून बातमी लोहिस्तोवर जख्मि कारचालकाचे नावाची माहिती नव्हती.

प्राप्त माहिती नुसार सदर जख्मि कारचालक हा स्वामी नारायण मंदिर जवळील वाठोडा येथील राहिवासीं असून कारचालक हा आपले खाजगी कामे आटोपून कार क्र एम एच 49 बी 9924 ने सदर घटनास्थळ मार्गे रेल्वे ओलांडून जात असता या निर्मनुष्य असलेल्या रेल्वेफाटक रेल्वे रूळावरून उमरेड कडे जाणारी रेल्वे प्रवासी ने लादून भरलेली रेल्वेगाडी ने कार ला दिलेल्या जोरदार धडकेत कार ही गोल गोल फिरून काही दूर अंतरापर्यंत जाऊन रेल्वे रुळाखाल उतरून रेल्वे रुळाच्या कडेला असलेल्या खोल भागात जाऊन आदळली दरम्यान कारचालकाचे पूर्णता नोयंत्रण सुटले असल्याने कारचालक गंभीर जख्मि झाला . घटना घडताच रेल्वेगाडी चालकाने रेल्वे गाडी थांबवली तसेच नागरिकांनी मदतीची धाव घेत जख्मि ला कार बाहेर काढून उपचारार्थ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

:-भांडेवाडी-दिघोरी नरोगेज रेल्वे मार्गावरून छोटी रेल्वे लाईन असून या मार्गावरून उमरेड-नरखेड याकडे जाणारी रेल्वे लाईन आहे.ही रेल्वे फाटक निर्मनुष्य असून कित्येक वर्षांपासून या रेलवे रुळावर रेलवे फाटक लावली नसून रेल्वे गाडी आल्यास एक रेलवे कर्मचारी येऊन रेलवे रूळ ओलांडणाऱ्या वाहतूक दारांना थांबवतो व रेलवे गाडीला हिरवी झेंडी दाखवून गाडी पास करीत असतो मात्र आज जोमाचा पाऊस सुरु असल्याने या रेल्वे कर्मचारीला गाडी येण्याचे संकेत न मिळाल्याने झालेल्या दिशाभूल मधून सदर अपघात घडला मात्र या अपघातात सुदैवाने जीवितहाणी टळली.