Published On : Wed, Apr 10th, 2024
By Nagpur Today Nagpur News

बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावतींची उद्या नागपुरात जाहीर सभा

Advertisement

नागपूर :लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील पाच जागांसाठी मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर बसपाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांची जाहीर सभा गुरूवार ११ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता बेझनबाग मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.

नागपुरातून योगेश लांजेवार हे बसपाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. यासोबतच रामटेकमधून संदीप मेश्राम, भंडारा-गोंदिया संजय कुभलकर, गडचिरोली -चिमूर योगेश गोन्नारे आणि चंद्रपूर येथून राजेंद्र रामटेके हे बसपाचे उमेदवार आहेत.

Gold Rate
Thursday 16 Jan. 2025
Gold 24 KT 79,000 /-
Gold 22 KT 73,500 /-
Silver / Kg 92,100 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या पाचही उमेदवारांच्या प्रचारासाठी मायावती यांची नागपुरात जाहीर सभा घेत आहेत. मायावती या दुपारी नागपूरला येतील. सर्वप्रथम त्या दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन करतील. त्यानंतर त्या सभेला संबोधित करणार आहेत.

Advertisement