Published On : Thu, Sep 12th, 2019

बसपा नेत्यांनी दीक्षाभुमीला भेट दिली

नागपुर: बसपा महारास्ट्र विधान सभेच्या सर्व जागा स्वबलावर लढविणार असून आजपासून विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. त्यामुले बसपा नेत्यांनी मुलाखतीपूर्वी बाबासाहेबांना अभिवादन करून आपल्या निवडणुक प्रचाराचा शुभारंभ केला.

बहुजन समाज पार्टी चे रास्ट्रीय महासचिव महारास्ट्र प्रदेशचे प्रभारी रामअचलजी राजभर साहेब, दुसरे रास्ट्रीय महासचिव राज्यसभा खासदार व महारास्ट्र प्रदेशचे प्रभारी डॉ अशोकजी सिद्धार्थ साहेब, प्रदेश अध्यक्ष सुरेशजी साखरे साहेब, प्रदेश उपाध्यक्ष कृष्णाजी बेले साहेब, प्रदेश कोषाध्यक्ष दयानंदजी कीरतकर साहेब ह्यांनी आज 12 सप्टेम्बर रोजी नागपुर दीक्षाभूमी ला भेट दिली.

बसपा नेत्यांनी डॉ बाबासाहेब आम्बेडकर स्मारकामधे पुष्प वाहून बुद्ध वंदना केल्यावर स्मारक समिती च्या वतीने नामदेवराव सुटे साहेबांनी बसपा नेत्यांचे स्वागत केले.

त्यांचे सोबत प्रदेश महासचिव जितेन्द्र म्हैसकर, प्रदेश सचिव भाऊसाहेब गोंडाने, उत्तम शेवड़े, जिल्हाध्यक्ष विलास सोमकुंवर, ऊषाताई बौद्ध, रंजनाताई ढोरे, अशोक डोंगरे, विवेक हाडके, राकेश गजभिये, भानुदास ढोरे, दिलीप बौद्ध, अक्षय जाम्बुळकर, विकास साखरे, अतुल चव्हाण, सुनील दरवाड़े, दयाशंकर काम्बले, दीक्षाभूमी सुरक्षा समिती चे सिद्धार्थ म्हैसकर, अशोक रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते.