Published On : Thu, Sep 29th, 2022
By Nagpur Today Nagpur News

बसपा नेते जिल्हाधिकाऱ्यांना भेटले

Advertisement

नागपुर – विविध समस्या घेऊन आज नागपूर जिल्हा बसपाचे अध्यक्ष संदीप मेश्राम यांच्या नेतृत्वात बसपा नेत्यांनी जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदने दिली.

निवेदनात अंबाझरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाकरता 20 एकर जागा आरक्षित ठेवून तेथील बांधकाम पूर्ण करणे, गोसेखुर्द धरणातील प्रकल्पग्रस्तांचे तातोली येथे पुनर्वसन करण्यात आलेल्या मोखेबर्डी, कीनिकला व कीटाळी येथील नागरिकांना नागरी सुविधा पुरवणे विषयी. तसेच फुटाळा येथील म्युझिकल फाउंटन शो मधील कॉमेंट्रीत दुरुस्ती करण्याविषयी च्या मागण्या करण्यात आल्या.

Gold Rate
07 May 2025
Gold 24 KT 97,500/-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 96,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शिष्टमंडळात प्रदेश महासचिव नागोराव जयकर, प्रदेश सचिव विजयकुमार डहाट, नितीन शिंघाडे, उत्तम शेवडे, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, सनी मून, जगदीश गजभिये, प्रवीण पाटील, पुणेश्वर मोटघरे आदीं पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

निवेदनात बसपा नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्याला सविस्तर सांगितले की 1956 ला बाबासाहेब आंबेडकर यांचा मनपाने सन्मान केल्यावर त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ अंबाझरी परिसरात 20 एकर जागा देऊन एक भव्य आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधले होते. ते जुलै 2021 रोजी एका षडयंत्रद्वारे गरुडा नावाच्या एका खाजगी कंपनीने त्याला भुईसपाट केले. त्यामुळे तीच जागा डॉ आंबेडकर सांस्कृतिक भवन च्या वास्तूसाठी आरक्षित ठेवावी.

गोसेखुर्द या धरणामध्ये नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात मोखेबर्डी, किन्हीकला व किटाळी ही गावे प्रकल्पग्रस्त झाली. त्यांचे तातोळी येथे पुनर्वसन करण्यात आले. परंतु 2018 पासून यांना कुठल्याही प्राथमिक सोयी पुरवण्यात आलेल्या नाही. त्या विनाविलंब पुरवण्यात याव्या अशी मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली.

तसेच फुटाळा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्युझिकल फाउंटन शो सुरू करण्यात आला. त्याचा ट्रायल शो सुरू असून त्यात दाखवलेली कॉमेंट्री नागपूरचा इतिहास यात अनेक त्रुट्या व चुका आहेत प्रामुख्याने बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेचा आकडा हा जाणून बुजून चुकीचा दाखवण्यात आलेला आहे. त्यात दुरुस्त्या कराव्या अशाही सूचना यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

याप्रसंगी प्रामुख्याने राष्ट्रपाल कांबळे, सदानंद जामगडे, विवेक सांगोडे, अंकित थूल, मॅक्स बोधी, बुद्धम राऊत, विकास नारायणे, गौतम पाटील, महेश सहारे, संजय जयस्वाल, राजकुमार तांडेकर, अनिल मेश्राम, शामराव तिरपुडे, पाली तसेच उमरेड येथील कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

उत्तम शेवडे, मा प्रदेश सचिव बसपा

Advertisement
Advertisement